बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर काही दिवसांपूर्वी भारतात परतली आहे. गेल्या मंगळवारी सोनम लंडनहून मुंबईला परतली आहे. मुलीला १ वर्षाने भेटणार या आनंदतात स्वत: अनिल कपूर तिला घ्यायला विमानतळावर गेले होते. त्यावेळी सोनम गर्भवती असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आता सोनमने सोशल मीडिया पोस्टवरून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक बुमरॅंग व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती एक पेय पिताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “माझ्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसासाठी गरम पाण्याची बाटली आणि अदरकची चहा”, असे कॅप्शन सोनमने दिले आहे. हा व्हिडीओ शेअर करत सोनमने ती गर्भवती असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत या सगळ्या अफवा असल्याचं दाखवलं आहे.
आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट
सोनम कपूर गेल्याच वर्षी करोना काळात भारतातून लंडनला गेली होती. लंडना गेल्यानंतर ती तिथल्या अनेक गोष्टींचे फोटोज आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत होती. कधी मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी तर कधी पतीसोबत रोमॅण्टिक डेट नाईट एन्जॉय करताना दिसून आली होती. ती शेअर करत असलेले सर्व फोटोज चाहत्यांना खूपच आवडत होते.
गेल्या वर्षी सोनमने ‘ब्लाइंड’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोम माखीजा यांनी केले आहे. हा चित्रपट ‘ब्लाइंड’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटात विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे या मुख्य भूमिकेत आहेत.