चीनमधील करोना विषाणूचा फैलाव संपूर्ण जगभरात झाला आहे. त्यामुळे प्रत्येक देश प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. यात भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र अजूनही काही लोक या लॉकडाउनला गंभीररित्या घेताना दिसत नाहीत. यावर गायक सोनू निगमने संताप व्यक्त केला आहे. ‘इटलीकडून आपण धडा शिकलोच नाही. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे’, अशा शब्दांत त्याने राग व्यक्त केला.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “इतकी लोकसंख्या असलेल्या देशासाठी सध्या लॉकडाउन हाच सर्वोत्तम व गरजेचा पर्याय आहे. मी सध्या दुबईत आहे. पण बाबांनी मला सांगितलं की अजूनही लोक मॉर्निंग वॉक, जॉगिंगसाठी बाहेर पडतात. दुकानं उघडी आहेत. लोकं बाहेर सहज फेरफटका मारत असतात. इटलीला पाहून आपण धडा शिकलोच नाही असं मला वाटतं.”

 

View this post on Instagram

 

#SingAndPrayWithSonu

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on

आणखी वाचा : ‘हे सर्व निराशाजनक’; देशातील परिस्थितीबद्दल बोलताना समीराला अश्रू अनावर 

सोनू निगम सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत दुबईत आहे. विमानांची उड्डाणं बंद केल्याने तो तिथेच अडकला आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांच्या संपर्कात आहे. लोकांना घरीच राहण्याचं आवाहनदेखील तो सोशल मीडियाद्वारे करत आहे.