बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये विशिष्ट संकल्पना किंवा थीमवर आधारित समारंभ आणि पार्टीज नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पाश्चात्य देशांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या ‘हॅलोविन’ थीमवर आधारित एका पार्टीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या पार्टीच्या सेट डिझाईनची जबाबदारी किंग खानच्या पत्नीने म्हणजेच गौरी खानने तिच्या खांद्यावर घेतली होती. गौरीने पहिल्यांदाच एखाद्या पार्टीसाठी सेट डिझाईन केला होता. या सेट डिझाईनच्या प्रोजेक्टसाठी तिने ‘हॅलोविन’ ही थीम निवडली होती.

गौरीनेच तिच्या या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत स्वत:च्या अनुभवाविषयी सर्वांना सांगितले. या पार्टीला बी- टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मनिष मल्होत्रा, सुझान खान, संजय कपूर, मीहा कपूर हे सेलिब्रिटी यावेळी मोठ्या उत्साहात वावरत होते. पण, या सगळ्या झगमगटात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती म्हणजे शाहरुख- गौरीची मुलगी सुहाना.

अनेक बॉलिवूड पार्टीजमध्ये सुहाना नेहमीच प्रसारमाध्यमांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. यावेळीही तिने आपल्या लूकने सर्वांना घायाळ केले. या पार्टासाठी तिने सोनेरी खडे असलेला एक शॉर्ट ड्रेस घाला होता. तिचा मेकअपही एखाद्या अभिनेत्रीप्रमाणेच करण्यात आला होता. त्यामुळे तिची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांची एकच झुंबड उडाली होती. सुहाना गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रम आणि सेलिब्रिटी पार्ट्यांना हजेरी लावतेय. या कार्यक्रमांमध्ये तिचा वावर, काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेले तिचे फोटोशूट या सर्व गोष्टी पाहता किंग खानची ही लाडकी लेक बी- टाऊनमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

https://www.instagram.com/p/BaxtSFwFmx5/

https://www.instagram.com/p/BaxlAK2llF2/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.