चित्रपटाचे प्रमोशन कशाप्रकारे केले जाते यावर चित्रपटाचे यश बऱ्याच अंशी अवलंबून असते. त्यामुळेच आजकाल प्रमोशनचे नवनवीन फंडे दिग्दर्शक आणि कलाकार घेऊन येताना दिसतात. ‘बाहुबली’मधला भल्लालदेव म्हणजेच राणा डग्गुबतीचा आगामी ‘नेने राजू नेने मंत्री’ हा तेलुगू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनोखी युक्ती वापरण्यात आलीये. ऑगमेंटेट रिअॅलिटी Augmented reality (AR) technology तंत्रज्ञानावर आधारित एक मोबाईल फोन अॅप्लिकेशन यासाठी तयार करण्यात आलाय. या अॅप्लिकेशनद्वारे चाहते राणा आणि अभिनेत्री काजल अग्रवालसोबत संवाद साधू शकतात.

एकीकडे या अॅप्लिकेशनबाबत चाहते उत्सुक असतानाच दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी राणा आणि काजलच्या थ्रीडी एआर मोशन पोस्टर 3D AR motion poster सोबत फोटो काढलाय. हा फोटो राणाने ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ज्यांनी भल्लालदेवची #Bhalladeva निर्मिती केली ते राधा आणि जोगेंद्रच्या #RadhaJogendra एआरसोबत उभे आहेत. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!’

‘बाहुबली’मध्ये जरी राणाच्या रुपातील खलनायक पाहायला मिळाला असला तरीही या आगामी चित्रपटात मात्र तो जनसमुदायाच्या नेत्याची भूमिका साकारणार आहे. ‘बाहुबली २’ च्या यशानंतर प्रभास आणि राणावर आगामी चित्रपटांमध्येही उत्तम भूमिका साकारण्याचे ताण नक्कीच असणार.

PHOTO : लंडनमध्ये सागरिका आणि झहीरचा ‘व्हेकेशन मोड ऑन’

‘नेने राजू नेने मंत्री’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. तामिळ, हिंदी आणि मल्याळम या तिन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये नवदीप आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.