राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी बंडाचा झेंडा हाती घेतला. रविवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. राजस्थानमधील या राजकीय घडामोडिंवर अभिनेते सुहेल सेठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकीला दिग्दर्शकाने सुनावले खडेबोल

अवश्य पाहा – बोटिंगला गेलेली अभिनेत्री झाली गायब; आठवडाभरापासून पोलीस करतायत चौकशी

“काँग्रेसचा हात भाजपाच्या हातात” असं ट्विट करुन त्यांनी काँग्रेस पक्षावर उपरोधिक टोला लगावला आहे. यापूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील राजस्थानमधील राजकारणावर टीका केली होती. “देशात महामारीचं संकट आहे. देश आर्थिक संकटात अडकला आहे. सैन्य देखील दररोज शत्रुशी दोन हात करत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत या मंडळींना राजकारण सुचतय? ही मंडळी देशातील परिस्थितीवर लक्ष देणार आहेत की नाही? खरंच हे नेता आहेत का? खरंच यांना जनतेची सेवा करायची आहे का?” अशा आशयाचं ट्विट करुन हंसल मेहता यांनी राजस्थानमधील राजकारणावर प्रश्न उपस्थित केले होते.

राजस्थानमधील हे प्रकरण नेमकं आहे काय?

सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. राजस्थानातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याने त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात संताप व्यक्त करत रविवारी काही समर्थक आमदारांसह दिल्ली गाठली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खंदे समर्थक आणि संघटनात्मक महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गेहलोत आणि पायलट यांच्या विकोपाला गेलेल्या सत्तासंघर्षांचा अहवाल राहुल यांना दिला. त्यात पायलट यांना पाठवलेल्या नोटिसीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी पायलट यांनी रविवारी दिल्लीत ठाण मांडले होते.