अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियलने जेव्हापासून निशाचं पालकत्व स्विकारलंय, तेव्हापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद द्विगुणीत झाल्याचं पाहायला मिळतंय. निशासोबत डॅनियलचं आऊटिंग असो, निशाने रंगवलेलं भेटकार्ड असो किंवा तिचा दुसरा वाढदिवस, सनी- डॅनियल तिच्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहेत. हॅलोविन जवळ येत असतानाच निशासोबत हॅलोविन पार्टी करण्यासाठी सनी उत्सुक आहे. निशासोबत हॅलोविनची तयारी करतानाचा फोटो आणि व्हिडिओ सनीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
३१ ऑक्टोबर हा ‘हॅलोविन डे’ म्हणून पाश्चिमात्य जगात साजरा केला जातो. यावेळी भोपळ्यामध्ये विविध चेहरे कोरले जातात आणि त्यामध्ये मेणबत्ती ठेवतात. रात्रीच्या अंधारात, त्या मेणबत्तीच्या प्रकाशात चेहरा कोरलेले भोपळे गूढ पण आकर्षक दिसतात. निशा आणि सनीने मिळून हॅलोविनसाठी भोपळा कोरला आहे. निशाने त्यातील गर काढण्यास मदत केली तर सनीने हा भोपळा कोरला. या आकर्षक भोपळ्याचा फोटो सनीने ट्विटरवर पोस्ट केला आहे. आपल्या पालकांसोबत निशा पहिल्यांदाच हॅलोविन साजरा करणार आहे.
Spooky Halloween is coming! Nisha's first pumpkin carving. She emptied it out and I carved this spooky cat for her! pic.twitter.com/MDSb5AduaU
— Sunny Leone (@SunnyLeone) October 16, 2017
Favourite holiday of the year! Halloween!! Nisha's first pumpkin carving date with her friends! pic.twitter.com/ynFKe6xzz7
— Sunny Leone (@SunnyLeone) October 16, 2017
वाचा : …म्हणून श्रद्धा कपूरनं बॅडमिंटनचं ट्रेनिंग थांबवलं
अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये गेल्या आठवड्यात निशाचा दुसरा वाढदिवस सनीने साजरा केला. या वाढदिवसानिमित्त निशाला डिस्नेलँडच्या अनोख्या दुनियेची सफरही सनीने करून दिली होती. निशाच्या संगोपनात कोणतीही गोष्ट कमी पडू न देता, छोट्या छोट्या गोष्टींमधून तिला आनंद देण्याचा प्रयत्न सनी आणि डॅनियल करत आहेत.