‘पिंक’ या सुपरहिट सिनेमामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा तेलगू सिनेमात काम करणार आहे. ‘आनंदो ब्रम्ह’ या सिनेमातून ती कमबॅक करतेय. ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाआधी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली असेच म्हणावे लागेल.

‘ईस्ट इंडिया कॉमेडी’च्या या व्हिडिओमध्ये तिने तेलगू दिग्दर्शक के राघवेंद्र यांच्यावर मस्करीत निशाणा साधला. तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करण्याच्या अनुभवाबद्दलही तिने भाष्य केले. या संभाषणात तिने सांगितले की, ‘दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मी फक्त मोहक भूमिकाच करु शकते, असं वाटत होतं. पण जेव्हा त्यांनी पिंक आणि नाम शबाना हे सिनेमे पाहिले तेव्हा त्यांना मी अभिनयही करू शकते याची उपरती झाली.’

एक माणूस माझ्या आयुष्यात आला आणि अर्ध्यावर निघून गेला.. बास एवढंच झालं- जेनिफर विंगेट

बेंबीबद्दल दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एवढं कुतूहल का असतं असा प्रश्न जेव्हा तिला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, ‘मला जर याबद्दल आधी माहित असतं तर मी माझ्या बेंबीवर काम केलं असतं. पण मला हे खरंच माहित नव्हतं. ज्यांनी मला तेलगू सिनेसृष्टीत आणले ते दिग्दर्शक अभिनेत्रींना सिनेसृष्टीत लाँच करण्यासाठीच ओळखले जातात. माझ्याआधी त्यांनी श्रीदेवी आणि जयसुधा या अभिनेत्रींना लाँच केलेले.

माझ्यासोबतचा त्यांचा तो १०५ वा सिनेमा होता. मी श्रीदेवी आणि इतर अभिनेत्रींचे व्हिडिओ पाहिले होते. सिनेमात प्रत्येकीवर फुलं किंवा फळं फेकलेले एखादे दृश्य असायचेच. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा त्यांनी माझ्या बेंबीवर चक्क नारळंच फेकले. बेंबीवर नारळ फेकण्यात कसली कामुकता आहे हे मात्र मला कळले नाही.’

तापसीने २०१० मध्ये ‘झुम्मनदी नादम’ या सिनेमातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन राघवेंद्र यांनी केले होते. याआधी तापसीने सोशल मीडियावर भारतीय सिनेसृष्टीत मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीबद्दल भली मोठी पोस्ट लिहिली होती.