अभिनेत्री करीना कपूर-खान आणि सैफ अली खान यांचा लेक तैमूर कायमच त्याच्या क्यूटनेसमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. त्यामुळे तैमूर कुठेही दिसला तरी छायाचित्रकार त्याची छबी उतरविण्यासाठी पुढे सरसावतात. तैमूर फोटोग्राफर्ससोबत फ्रेंडली राहत असून तो फोटोसाठी कायमच पोझ देत असतो. मात्र, अलिकडेच एका व्हिडीओमध्ये तैमूर सततच्या फोटो आणि व्हिडीओला कंटाळल्याचं दिसून येत आहे.

‘वूंपला’ने तैमूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तैमूर फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफरला पाहून वैतागल्याचं दिसून आलं. तैमूर आणि करीनाला पाहिल्यानंतर फोटोग्राफर्स तात्काळ या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ काढू लागले. मात्र, तैमूरला ते अजिबात आवडलं नाही आणि तो जोरात फोटोग्राफर्सच्या अंगावर ओरडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

करीना तैमूरला घेऊन तिच्या कारमधून उतरली. त्याचवेळी या दोघांचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर्स पुढे सरसावले. त्यावेळी नो फोटोज असं तैमूर म्हणाला. यावेळी करीना तैमूरला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने फोटोग्राफर्सला लाथ दाखवली.

वाचा : नेहा कक्कर लग्नापूर्वीच प्रेग्नंट?

दरम्यान, तैमूर हा लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. करीना लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यासोबतच ती लाल सिंह चड्ढा या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.