छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ या शोमध्ये काम करणारी अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेचा नुकताच साखरपुडा झाला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
सुगंधाने होणारा पती संकेत भोसलेसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने अंगठीचा इमोजी वापरला असून फोटो संकेतला टॅग केला आहे. त्यामुळे त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे समोर आले. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : ‘का अभिषेकची खोटी प्रशंसा करता?’, अमिताभ बच्चन झाले ट्रोल
View this post on Instagram
संकेतने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुगंधासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर, टोनी कक्कर, आकृती शर्मा अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
सुगंधा आणि संकेत अनेकदा एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसले होते. पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्यावर उघडपणे वक्तव्य केले नव्हते. आता त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे साखरपुडा झाल्याचे सांगितले आहे. चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.