‘सेलिब्रिटी किड्स’च्या यादीत अगदी कमी वयात सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली एक म्हणजे आराध्या बच्चन. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावते. आई-बाबांसोबत प्रसारमाध्यमांसमोर आल्यावर आराध्या सर्वांसोबत विनम्रतेने वागते. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही तिचं सुरेख नातं नेहमीच पाहायला मिळालं आहे.

रविवारी बिग बी जेव्हा चाहत्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर येतात तेव्हाही काहीशी घाबरलेली आराध्या त्यांच्यासोबत चाहत्यांना आजोबांप्रमाणेच अभिवादन करत होती. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत जवळचं नातं असणारी ही आराध्या तिच्या आजीसोबत म्हणजेच जया बच्चन यांच्यासोबत फार कमी दिसते. यामागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न आजवर अनेकांच्याच मनात आला आहे.

काही वेबसाइट्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ऐश्वर्या नेहमीच आराध्याच्या भोवती असते. तिला कोणतीही मदत लागली किंवा काही प्रश्न पडले तर त्यांची उत्तरं देण्यासाठी ऐश्वर्या नेहमीच पुढे सरसावते. त्यामुळे आराध्या कधीच आपल्या आजी- आजोबांपर्यंत जात नाही. किंबहुना ऐश्वर्या काही मदत लागली तर आपल्या आईची म्हणजेच वृंदा राय यांची मदत घेते. त्यामुळे आराध्याचा वृंदा राय यांच्याकडेच जास्त ओढा आहे.

आराध्यासोबत फारसा वेळ घालवण्याची संधी न मिळाल्यामुळेच जया बच्चन यांच्यासोबतचं तिची गट्टी जमत नाही असं दिसतंय. सोशल मीडियावर आराध्याचे जया यांच्यासोबतचे फोटोही सापडत नाहीत. त्यामुळे या साऱ्याला कुठेतरी ऐश्वर्याच अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांचे फारसे चांगले संबंध नसून, त्यांच्यात काही मतभेद असल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्यात असणाऱ्या मतभेदांमुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचंही म्हटलं जात आहे.