टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ गेल्या काही दिवसांपासून टायगरच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. त्यांच्या या चिंतेचं कारण टायगरचे चाहते आहेत. अनेकदा कार्यक्रमांमध्ये चाहते टायगरच्या इतक्या जवळ येतात की कधी कधी त्याला दुखापतीचीही शक्यता असते. ‘मुन्ना मायकल’ चित्रपटाचे प्रमोशन करत असताना टायगरसोबत अशीच एक घटना घडली. त्यामुळे टायगरसोबत यापुढे एक नाही तर पाच सुरक्षारक्षक ठेवण्याचा विचार आयशा करत आहेत.

‘मुन्ना मायकल’च्या प्रमोशनसाठी टायगर अहमदाबादमध्ये परफॉर्मन्ससाठी गेला होता. एका मॉलमध्ये टायगरला चाहत्यांनी घेरलं. त्याचा सुरक्षारक्षक यावेळी गाडी आणण्यासाठी गेला होता. चाहत्यांची वाढती संख्या पाहता टायगरला अखेर तेथून पळावं लागलं. या घटनेत त्याच्या पाठीला दुखापतही झाली. या घटनेसंदर्भात जेव्हा टायगरच्या आईला कळालं तेव्हा त्यांनी यापुढे त्याच्यासोबत पाच सुरक्षारक्षक ठेवण्याचा निर्णय घेतला. पाच सुरक्षारक्षकांशिवाय टायगर बाहेर पडणारच नाही असा नियम त्यांनी केला.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल

वाचा : मादाम तुसाँमध्ये खुलणार मधुबालाचं हास्य

टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट २१ जुलै रोजी प्रदर्शित झाला. दोन दिवसांत चित्रपटाने १२.८० कोटींची कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळतोय. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ मध्येही टायगर भूमिका साकारणार असून चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानंतर ‘बागी २’ चित्रपटातही टायगर दिशा पटानीसोबत भूमिका साकारणार आहे.

Story img Loader