‘बिग बॉस’चा अकरावा सिझन सुरू झाल्यापासून सर्वांत जास्त चर्चेत असणारं नाव म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिंदे. ‘भाभीजी घरपे है’ या मालिकेत तिने साकारलेल्या अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरातील वादांमुळे शिल्पा चर्चेत आहे. विकासनंतर ‘बिग बॉस’च्या घरात नुकताच शिल्पाचा आणखी एका व्यक्तीसोबत वाद झाला. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री हिना खानसोबत तिचे भांडण झाल्याचे पाहावयास मिळाले.

शिल्पा आणि हिनाच्या या वादाची सुरूवात एका टास्कवरून झाली. ‘बिग बॉस’ने पाठवलेल्या लक्झरी टास्कची माहिती वाचून दाखवण्याची वेळ शिल्पावर आली होती. या टास्कशी निगडीत पत्र शिल्पाला वाचून दाखवायला सांगितले तेव्हा तिला ते पत्र नीट वाचता येत नव्हते. अखेर वैतागून हिनाने पत्र वाचण्यास घेतले. त्यानंतर तिने शिल्पाच्या इंग्रजीवरून तिची खिल्लीही उडवली होती. हिनाचे हे वागणे ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक आणि विजेती गौहर खानला पटले नाही. त्यावर तिने ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आणि अप्रत्यक्षपणे हिनाला टोला लगावला. ‘वाचता न येणे ही वाईट गोष्ट आहे का? तुम्हाला इंग्रजी भाषा येत नसेल तर याचा अर्थ तुम्ही अशिक्षित आहात असा होतो का?,’ असे ट्विट गौहरने केले.

‘अंगुरी भाभी’च्या इंग्रजीची हिनाने उडवली खिल्ली; गौहर खानचा चढला पारा

ओमर अब्दुल्ला आणि अदनान सामी यांच्यात ‘ट्विटर- वॉर’

जेव्हा शाहरुखला वैतागून गौरीने केला होता ब्रेकअप

कंगनाची कहाणी एकतर्फी- फरहान

‘शेफ’साठी सैफने कापले होते हजारो कांदे

…अन् तिने शाहरूखला म्हटलं सलमान

”न्यूड’ होण्यास मला काहीच अडचण नाही’

ट्विटरवर ‘रेपिस्ट’ म्हणणाऱ्या तरुणीला अर्जुन कपूरचं सडेतोड उत्तर

नागार्जुनच्या सुनेबद्दल या गोष्टी माहितीहेत का?

EXCLUSIVE PHOTO : आणखी एक मराठी अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.