संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाला विरोध अजूनही कमी झालेला नाही. चितौडगढ किल्ल्यावरील पद्मिनी महालाबाहेर असलेला शिलालेख झाकून टाकण्यात आला आहे. अलाउद्दीन खिल्जीने राणी पद्मिनीला पाहिल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे. त्यामुळे राजपूत करणी सेनेने दिलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाने शिलालेख झाकला.
जोधपूर येथील विभागीय कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांच्या परवानगीने हा शिलालेख झाकण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय पुरातत्व विभागाने हा शिलालेख लावला असून पद्मिनी महालात अलाउद्दीन खिल्जीने राणी पद्मिनीला पाहिले होते, असा उल्लेख या शिलालेखावर करण्यात आला आहे. करणी सेनेच्या सदस्यांनी या शिलालेखावर आक्षेप घेतला असून हा शिलालेख तात्काळ हटवण्यात यावा अशीही मागणी केली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
…म्हणून पद्मिनी महालाबाहेरचा शिलालेख झाकला
आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत
सनी लिओनीशी केलेली मस्करी पडू शकते महागात
…जेव्हा किंग खान दीपिकाच्या आईने लिहिलेलं पत्र वाचतो
VIDEO: ..अन् मानुषीने ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट उतरवला
PadMan new poster: सुपर हिरो है ये पगला..
Miss Universe 2017 : दक्षिण आफ्रिकेची डेमी लेई ‘मिस युनिव्हर्स २०१७’
काय, ‘जाडूबाई जोरात’ आता दुपारी पाहता येणार नाही!
तणाव निर्माण होऊ नये म्हणून भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून ‘पद्मावती’वर बंदी- जेटली