बॉलिवूडचा अतरंगी अभिनेता रणवीर सिंगच्या बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा रणवीर कधीही न पाहिलेल्या अशा हटके भूमिकेत त्याच्या चाहत्यांना दिसणार होता. मात्र, चित्रपटाभोवती असलेला वादाचा गराडा काही संपत नसल्यामुळे आता ‘पद्मावती’ प्रदर्शित होणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असे असले तरी रणवीरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच हा अभिनेता तुम्हाला आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

करण जोहरने बुधवारी संध्याकाळी ट्विटवर उद्या सकाळी एक मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून करण नक्की कसली घोषणा करणार आहे याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज सकाळी त्याने ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटाचा टीझर पोस्टर ट्विट केला. या पोस्टरवर पोलिसाच्या वेशातील पिळदार मिशा असलेला अतरंगी रणवीर पाहावयास मिळतो. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर २’ नंतर करणचा हा २०१८मधील दुसरा मोठा चित्रपट असेल.

Simmba teaser poster: ‘सिंघम’ नंतर आता येतोय ‘सिम्बा’

Sexiest Asian Woman : ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत दीपिकापेक्षा टीव्ही अभिनेत्री सरस

चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी का?; ग्राहक कल्याण समितीचा सवाल

Year End 2017 Special : प्रियांका, ऐश्वर्याला मागे टाकत सनीच ठरली बहुचर्चित सेलिब्रिटी

शनाया वागणार ‘शान्यासारखं’!

‘या’ अभिनेत्रीकडून ई-मेलवर उत्तराची अपेक्षाच करु नका

शशी कपूर यांच्या निधनानंतर सोनिया गांधीचे कपूर कुटुंबाला पत्र

जीवनाचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या ‘आम्ही दोघी’

सई ताम्हणकरची आगळीवेगळी मेकअप आर्टिस्ट!