या महिन्यात अंडवरवर्ल्ड दुनियेतील दोन व्यक्तींच्या आयुष्यावर बेतलेले सिनेमे प्रदर्शित होत आहेत. कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या आयुष्यावर बेतलेला ‘डॅडी’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला तर, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरवरील सिनेमा २२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. स्वतः अर्जुन रामपाल डॅडीच्या भूमिकेत दिसत आहे तर श्रद्धा कपूर हसीना पारकरची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार. अर्जुन आणि श्रद्धा भलेही एकमेकांचे फार चांगले मित्र असले तरी या दोघांनी ज्या व्यक्तिरेखा साकारल्या ते कधीच चांगले मित्र नव्हते. डॅडी आणि हसीना एकमेकांचे कट्टर वैरी होते.

सायनाची भूमिका साकारणाऱ्या श्रध्दाचे ‘दीपिका कनेक्शन’

‘आज तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ८० च्या दशकाच्या सुरुवातीला अरुण गवळीला दाऊदचे परदेशातून येणाऱ्या इलेक्ट्रिक वस्तूंच्या सुरक्षेची जबाबदारी दिली होती. याचदरम्यान अरुणचा मित्र रामा नाईक एका जमीन विवादावरुन दाऊदचा वैरी झाला. दाऊदने रामाला आपल्या गँगमधून काढून टाकले. तेव्हा गवळीने दाऊद विरोधात लढाई सुरू केली.

म्हटले जाते की, या दोघांमधील भांडण ऐरणीवर असताना दाऊदने गवळीच्या भावाची हत्या केली. आपल्या भावाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी डॅडीने दाऊदच्या बहिणीच्या पतीची म्हणजे इस्माइल पारकरची हत्या केली. इस्माइल हा हसीना पारकरचा नवरा होता. पतीच्या मृत्यूनंतर हसीना अंडरवर्ल्डमध्ये आली. ती नागपाडा येथील गार्डन हॉल अपार्टमेंटमध्ये राहायला गेली. तिथूनच ती आपला व्यवहार चालवत होती. हळूहळू मुंबईवर हसीनाचा जम बसत गेला आणि नागपाडाची गॉडमदर म्हणून ती ओळखली जाऊ लागली.

बॉबी डार्लिंगची सासू म्हणते माझी सून पहिलवान

हसीनाचा मृत्यू ६ जुलै २०१४ ला झाला. हसीना विरुद्ध ८८ गुन्हे दाखल होते पण ती तिच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच न्यायालयात गेली. असे म्हटले जाते की, दाऊदच्या १००० कोटी रुपयांचा अंडरवर्ल्डमधील व्यवहार हसीना एकटी सांभाळायची. म्हणूनच तिला अंडरवर्ल्डची क्वीन म्हटले जायचे. हसीना सिनेमात श्रद्धा चार वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसणार आहे. सिनेमात ती तरुणीपासून ते एका मुलाची आई या लुक्समध्ये दिसणार आहे.