करिना कपूर आणि सोनम कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाचा दुसरा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. पहिल्या पोस्टरमध्ये चित्रपटातील ‘गर्ल गँग’ सुंदर लेहंग्यामध्ये झळकली, तर आता दुसऱ्या पोस्टरमध्ये शेरवानी आणि पगडीमधील या अभिनेत्री वरातीत नाचण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहेत. ‘वीरे दी वेडिंग’ या नावातूनच चित्रपटात लग्नाची पार्श्वभूमी दाखवण्यात येणार असल्याचे समजते. चित्रपटाची आकर्षक पोस्टर्स पाहून प्रेक्षकांमध्ये ‘वीरे दी वेडिंग’साठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पहिल्या पोस्टरमध्ये कलात्मकतेने चारही अभिनेत्रींचा चेहरा झाकलेला होता. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये करिना कपूर, सोनम कपूर, आणि शिखा तस्लानिया या चौघीही नाचताना पाहायला मिळत आहेत. स्वरा भास्कर मात्र या तिघींकडे एका वेगळ्याच आविर्भावात पाहताना दिसते. सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा पोस्टर शेअर केला असून ‘वीरे दी वेडिंग’मध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे.

वाचा : आणखी एका हॉलिवूड दिग्दर्शकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

चित्रपटाच्या सेटवर या चौघींमध्ये ‘कॅट फाईट’ झाल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. मात्र, नंतर सोनम कपूरने ट्विट करत या चर्चा खोट्या असल्याचे स्पष्ट केले. शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु असून दिल्लीनंतर आता या चित्रपटाची टीम बँकॉकला रवाना होणार आहे. एकता कपूर आणि रीया कपूरने चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे महिन्यात सर्वत्र लग्नसंभारभांची रेलचेल असते. हीच वेळ साधून चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी १८ मे रोजी ‘वीरे दी वेडिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.