करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात सोशल मीडियावर लोकांकडून ८० च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय रामायण मालिका सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. ही मालिका ऑन-एअर होताच या मालिकेने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग मिळवला असून टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले आहेत. या प्रेक्षकांमध्ये भारताचा तडाखेबाज माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याचाही समावेश आहे.
‘रामायण’मुळे डीडी वाहिनीची ‘हनुमान’ उडी; केला नवा पराक्रम
रामायण मालिकेसंबंधी सेहवागने हटके ट्विट करत पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. रविवारी रामायण मालिकेत एक भाग प्रसारित झाला. त्यात वालीपुत्र अंगद रावणाच्या दरबारात आला आणि आपला पाय जमिनीवर रोवून त्याने राजदरबारातील रथी-महारथींना आपला पाय हलवून दाखवण्याचे आवाहन केले, पण कोणालाही ते जमले नाही. अखेर रावण आला तेव्हा अंगदाने पाय स्वत: मागे घेत त्याला रामाचे पाय धरायचा सल्ला दिला. याच चित्रणातील दोन फोटो सेहवागने ट्विटरवर शेअर केले आहेत. त्या फोटोंसह त्याने लिहिले आहे की मी माझ्या फलंदाजीची प्रेरणा येथून घेतली. पाय हलवणं कठीणच नव्हे तर अशक्य आहे. अंगदी जी तुमचा विजय असो.
So here is where i took my batting inspiration from 🙂
Pair hilana mushkil hi nahi , namumkin hai . #Angad ji Rocks pic.twitter.com/iUBrDyRQUF
— Virender Sehwag (@virendersehwag) April 12, 2020
Coronavirus Lockdown : रामायण मालिकेने केला धडाकेबाज विक्रम
दरम्यान, ८० आणि ९० च्या दशकातील रामायण, ब्योमकेश बक्षी आणि शक्तीमान या मालिकांचे पुन:प्रक्षेपण सुरू झाल्याने डीडी वाहिनी सर्वाधिक पाहिली गेलेली वाहिनी ठरली आहे. २८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात डीडी नॅशनल वाहिनीने दमदार पराक्रम करून दाखवला आहे. २१ ते २७ मार्च या काळात हिंदी मनोरंजनाच्या वाहिन्यांमध्ये डीडी पहिल्या १० मध्ये देखील नव्हते, पण २८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात डीडी वाहिनी सारे विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान पटकावले आहे.
ऑस्ट्रेलियाचा वॉटसन म्हणतो, “…तर मी संघाबाहेर केवळ पाणी देत राहिलो असतो”
Broadcast Audience Research Council-Nielsen ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीनुसार डीडी नॅशनल वाहिनीचा प्रेक्षकवर्ग १३ व्या आठवड्यात (२८ मार्च ते ३ एप्रिल) सकाळी ९ ते १०.३० या कालावधीत ५८० मिलियन एवढा झाला आहे. गेल्या आठवड्यात हा प्रेक्षकवर्ग केवळ १ मिलियन इतकाच होता. याशिवाय १३ व्या आठवड्यातील करस्पॉडिंग प्रेक्षकवर्गदेखील ८३५ मिलियन एवढा दिसून आला. १२ व्या आठवड्यात तो केवळ २ मिलियन इतकाच होता. डीडी नॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशी शेखर यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.