‘जज्बा’, ‘सरबजीत’, ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात आपल्या हरहुन्नरी अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आता ‘फॅनी खान’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सिनेमाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी एका कलाकाराने यात काम करण्यास नकार दर्शविला आहे. ऐश्वर्यासोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार प्रयत्न करत असताना असं काय घडलं असेल की या अभिनेत्याने चक्क ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार दिला? तो अभिनेता नेमका आहे तरी कोण? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.

रितेश देशमुखही म्हणतो ‘एक मराठा, लाख मराठा’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात ऐश्वर्या एका तरुण कलाकारासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याकरिता दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या टीमने विवेक ओबेरॉयचा चुलत भाऊ अक्षय ओबेरॉयला विचारले होते. पण अक्षयने मात्र या भूमिकेसाठी स्पष्ट नकार दिला. अक्षयसारख्या तरुण कलाकाराने ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार देणे ही गोष्ट तशी धक्कादायकच म्हणावी लागेल. त्यातही तरुण पिढीतल्या अभिनेत्याने ऐश्वर्याला नकार देणे हे बहुधा पहिल्यांदाच घडलं असेल.

अक्षय ओबेरॉय हा विवेक ओबेरॉयचा सख्खा चुलत भाऊ आहे. ऐश्वर्या आणि विवेक यांच्यातल्या नातेसंबंधांबद्दल तर साऱ्यांनाच माहित आहे. त्यांच्यातल्या याच संबंधांमुळे अक्षयने ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार दिला होता असे म्हटले जात आहे. पण सिनेमाच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी या सर्व चर्चा या फक्त अफवा असल्याचे सांगितले.

सिनेमाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग, दिग्दर्शक फरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी ‘फॅनी खान’ या सिनेमात ऐश्वर्याच्या अपोझिट अद्याप कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. मात्र विवेकसोबतही ऐश्वर्याचे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही. कदाचित याच प्रकरणामुळे अक्षय ओबेरॉयने ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार दिला असावा.