कॉमेडियन कपिल शर्माचा आगामी चित्रपट ‘फिरंगी’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर कपिल चित्रपटाचं जोरदार प्रमोशनसुद्धा करताना दिसत आहे. या चित्रपटाशी निगडीत प्रत्येक अपडेट देणाऱ्या कपिलने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा होत आहे, कारण कपिलची भाची यामध्ये ‘फिरंगी’चं प्रमोशन करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये दीड वर्षाची समायरा अत्यंत निरागसतेने ‘ओय फिरंगी’ हे गाणं म्हणताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कपिलने लिहिलंय की, ‘उफ्फ…संपूर्ण कुटुंबच अत्यंत प्रतिभावान आहे. पाहा, दीड वर्षाची माझी भाची समायरा ‘ओय फिरंगी’ हे गाणं गात आहे.’
Uff .. sari family hi bahut talented hai.. see my 2 n half years old niece samayra singing oye firangi #firangi muuuuaaahh pic.twitter.com/JoAfjBiV8Z
— KAPIL (@KapilSharmaK9) November 5, 2017
वाचा : कंगना रणौत ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करण्याच्या मोहिमेवर?
२७ ऑक्टोबर रोजी हे गाणं प्रदर्शित झालं होतं आणि युट्यूबवर त्याला आतापर्यंत ४१ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. जीतेंद्र शाहने या गाण्याला संगीतबद्ध केलं असून सुनिधी चौहानने ते गायलं आहे. ‘फिरंगी’ हा कपिल शर्माचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी २०१५ मध्ये त्याचा ‘किस किसको प्यार करूं’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये कपिलसोबत अभिनेत्री मोनिका गिलसुद्धा भूमिका साकारणार आहे. २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.