एकीकडे रेसलिंगचा बादशहा ट्रिपल एच आणि दुसरीकडे बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन, या दोघांचं फक्त नावच पुरेसं आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज. अचानक या दोघांचा उल्लेख का येतोय असा प्रश्न तुम्हाला पडला ना? पण त्यामागचं कारणही तसंच आहे.

रेसलिंगच्या बादशहाने बॉलिवूडच्या शहेनशहाचा एक सुप्रसिद्ध डायलॉग म्हटलाय. हा व्हिडिओ पाहून ट्रिपल एच तुमचंही मन नक्कीच जिंकेल.
‘डब्ल्यूडब्ल्यूई’च्या एका कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी माजी वर्ल्ड चॅम्पियन ट्रिपल एच नुकताच मुंबईत आला होता. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्याने अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग सादर केला. ‘रिश्ते में तो हम तुम्हारे…’ हा बिग बींचा डायलॉग म्हणतानाचा त्याचा व्हिडिओ युट्यूबवर पाहायला मिळतोय.

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Jugaad Video
चावी न वापरता सुरू करता येईल स्कुटी! अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ

वाचा : ‘धक धक गर्ल’ लवकरच करणार मराठीत पदार्पण

आजपर्यंत बऱ्याच विदेशी खेळाडूंनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ट्रिपल एचचा हिंदीतील संवाद आणि डायलॉग बोलण्याची स्टाइल पाहून भविष्यात तोसुद्धा एखाद्या बॉलिवूड चित्रपटात दिसला तर नवल वाटणार नाही.