बॉलिवूडमधील ‘मेड फॉर इच अदर’ जोड्यांमध्ये अमिताभ आणि जया बच्चन या जोडीचे नाव न चुकता घेतले जाते. रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करणाऱ्या या जोडीने ३ जून १९७३ रोजी खऱ्या आयुष्यातही एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला. बिग बी आणि जया यांच्या लग्नाला ४४ वर्षे झाली असून, त्यांना श्वेता नंदा आणि अभिषेक ही दोन मुले आहेत.

वाचा : टेलिव्हिजनवरील कलाकारांना कुत्र्यासारखं राबवून घेतात- सैफ

बिग बी सोशल मीडियावर बरेच सक्रिय असून, त्यांच्या चाहत्यांशी ते ट्विटर, ब्लॉग, फेसबुकद्वारे संपर्क साधतात. एकदा आपल्या लग्नाच्या आठवणी जागवत त्यांनी ब्लॉगवर लिहिलेलं की, आमचे लग्न सुरु असताना जोरात पाऊस पडू लागला. त्यावर आमचे नातेवाईक आणि उपस्थितांनी आमच्याकडे येऊन लग्न लवकरात लवकर उरकण्याची विनंती केलेली.

या जोडीने आजवर ‘बनसी बिरजू’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘एक नजर’, ‘बावर्ची’, ‘जंजीर’, ‘शोले’, ‘कभी खुभी कभी गम’, ‘कि अॅण्ड का’ यांसारख्या कित्येक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेय.

प्रश्न – अमिताभ-जया बच्चन यांचा पहिला एकत्र चित्रपट कोणता?
१. अभिमान
२. बनसी बिरजू
३. गुड्डी

वाचा : कंगनाची कहाणी एकतर्फी- फरहान

काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांना सर्वोत्कृष्ट संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी हा आमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हणत बिग बींनी ट्विटरवर त्यांचे अभिनंदन केले होते. त्यांनी लिहिलेलं की, ‘जयाला आज सर्वोत्कृष्ट संसदीय पुरस्कार मिळाला. हा आमच्या कुटुंबासाठी एक अभिमानाचा क्षण असून, मी तिचे अभिनंदन करु इच्छितो.’

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
अक्षय कुमारचा ‘हॉलिडे’ कोणत्या चित्रपटाचा रिमेक आहे?
उत्तर – थुप्पक्की