बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या सेटवर अपघात झाल्याच्या बऱ्याच घटना यंदाच्या वर्षात समोर आल्या. ‘पद्मावती’, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ आणि इतरही काही चित्रपटांच्या सेटवर क्रू मेम्बर्सचा अपघात झाल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता अशीच एक घटना समोर आली आहे. ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘फॅनी खान’ चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्याचे कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : रणबीर-माहिराच्या व्हायरल फोटोंबद्दल रणवीर म्हणतो..

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील फ्लोरा फाऊंटनजवळ चित्रीकरण सुरु असताना काल हा अपघात झाला. चित्रपटाच्या टीममधील एका मुलीने कानाला हेडफोन्स लावले होते. त्यामुळे तिच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकलचा अंदाज तिला आला नाही. ती मुलगी रस्ता ओलांडत असताना मोटरसायकलने तिला धडक दिली. यानंतर तिला लगेचच प्रथमोपचार देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेवेळी ऐश्वर्याही तिथेच उपस्थित होती. अपघाताचे वृत्त कळताच ती घटनास्थळी पोहोचली. मात्र, त्या मुलीच्या जवळ जाण्यापासून सुरक्षारक्षकांनी तिला अडवले.

वाचा : लढवैय्या गुंजन सक्सेना यांचे आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणार

‘एव्हरीबडीज फेमस’ या डच चित्रपटापासून ‘फॅनी खान’ प्रेरित आहे. करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये शेवटची झळकलेली ऐश्वर्या ‘फॅनी खान’ या म्युझिकल ड्रामापटात गायिकेच्या भूमिकेत दिसेल. राकेश ओमप्रकाश मेहराची निर्मिती असलेला हा चित्रपट पुढील वर्षी १३ एप्रिलला प्रदर्शित होईल.