बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि राज कुंद्राच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीत. राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबई क्राइम ब्रांचकडून याचा तपास सुरु असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता राजला एका जुन्या खटल्यात मोठा धक्काच बसला आहे. अभिनेता आणि निर्माता सचिन जोशी याच्यासोबत सुरू असलेल्या खटल्यात राजला मुंबई हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात सचिन जोशीने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची सतयुग गोल्ड या कंपनीविरोधात सोन्याच्या योजनेत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता सचिनने हा खटला जिंकला आहे. राज ‘सतयुग गोल्ड’चा माजी संचालक आहेत. सतयुग गोल्डने सचिनला एक किलो सोन सोपवत एक लाख रुपये देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. यासोबतच कायदेशीर कारवाईत गुंतवलेले ३ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
View this post on Instagram
आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट
एका वृतवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, “माझी कायदेशीर लढाई म्हणजे केवळ सतयूग गोल्डमध्ये गुंतवणूक केलेल्या त्या गुंतवणूकदारांचे प्रतिनिधित्व, ज्यांना सूट देत गोल्ड कार्ड योजनेत गुंतवणूक करण्याचे सांगण्यात आले, पण त्यांना कधीच सोनं मिळू शकले नाही. सचिनला आता त्याचं सोन मिळालं आहे, तर राजला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाल्याने तो आनंदी आहे,” असे सचिन म्हणाला.
आणखी वाचा : नवीन App सुरु करण्याचा होता राज कुंद्रांचा विचार; मेहुणी शमिता शेट्टीही करणार होती काम
काय आहे हे प्रकरण?
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक सोन्याची ट्रेडिंग कंपनी सुरू केली होती. २०१४ मध्ये सचिनने या कंपनीच्या गोल्ड कार्ड योजनेत गुंतवणूक केली होती. मार्च २०१४ मध्ये त्याने सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून १८.५८ लाख रुपयांत एक किलो सोनं विकत घेतलं होतं. त्यावेळी, त्याला पाच वर्षांच्या योजने अंतर्गत कमी किमतीत गोल्ड कार्ड देण्यात आले आणि त्याला सांगितले होते की ठरलेला कालावधी संपला की तो या कार्डच्या बदल्यात सोनं घेऊ शकेल.
आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”
ज्यावेळी ही गुंतवणूक केली होती त्यावेळी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे या कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होते. मार्च २०१९ मध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर सचिनने ते कार्ड परत देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला समजले की वांद्रे-कुर्ला परिसरातील कंपनीचे कार्यालय बंद झाले आहे. यानंतर तो सतत कंपनीशी संपर्क साधत होता, पण त्याला उत्तर मिळाले नाही. यानंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.