गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यानंतर डॅमसंपूर्ण भरल्याने डॅमचं पाणी सोडण्यात आलं आणि नद्यांना पुर आला. अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. तर रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे काही निष्पाप नागरिकांनी आपले प्राणही गमावले आहेत. चिपळूण, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. हे पाहता कोकणातील लोकांच्या मदतीसाठी अनेक लोक पुढे आले आहेत. तर अभिनेता भरत जाधवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना कोकणाला मदत करण्याचे आवाहन दिले आहे.

भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक मेसेज दिला आहे. युथ फॉर डेमॉक्रसी आपल्या कोकणाला देऊया मदतीचा हात जास्त दिवस टिकतील असे अन्न पदार्थ, कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, अंथरून-पांघरुण मदत कुठे आणि कशी कराल यासाठी त्याने फोन नंबर देखील दिले आहेत. ही पोस्ट शेअर करत ‘आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. या पूर संकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या,’ असे कॅप्शन त्याने दिले आहे.

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

आणखी वाचा : ‘हे तर आतंकवाद्यांसारखंच..’; राज कुंद्रांच्या अटकेवर सुनील पालची प्रतिक्रिया

तळई गावात दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा बळी गेला आहे. महाड आणि चिपळूण शहरांमध्ये पूर आला असून शहरं पाण्याखाली गेली आहेत. तर पुरात व भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व त्यांचं स्थलांतर करण्या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशही दिले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात १२९ च्या जवळपास लोकांचा बळी गेला आहे.

Story img Loader