टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस ११’ हा रिअॅलिटी शो दिवसेंदिवस वादग्रस्त होत चालला आहे. सततची भांडणे, अपशब्दांचा वापर, तसेच खोटं बोलण्यापासून बिग बॉसच्या घरातील जवळपास सगळेच नियम मोडताना स्पर्धक पाहावयास मिळत आहेत. त्यानंतर सलमान खान आणि त्याच्या ‘वीकेण्ड का वार’ने उरलेली कमतरता भरून काढली आहे. पहिल्याच आठवड्यात झालेल्या एलिमिनेशनमध्ये सलमानचा राग ओढावून घेणारा जुबैर खान याचाही समावेश होता. सलमानने जुबैरला मर्यादेत राहण्याचा इशारा देऊनही काही स्पर्धकांनी त्याला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले. पण यानंतर जे काही झाले त्याचा विचार स्पर्धकांनी तर सोडाच पण सलमाननेही केला नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’मधील त्या सदस्याचे निधन

सर्व वादानंतर जुबैरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी जनतेच्या मतांचा निकाल आल्यानंतर जुबैर शोमधून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यात आले. एलिमिनेशननंतर जुबैरने सलमान आणि स्पर्धकांमध्ये होणाऱ्या सेशनवर आरोप करत बॉलिवूडच्या भाईजानविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ‘सलमानने मला यापुढे कुठेही काम करु न देण्याची धमकी दिली.’, असे त्याने तक्रारीत म्हटले. पण हा सर्व वाद यावरच संपलेला नाही.

जुबैरने सोमवारी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून तो बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला नसल्याचे उघड केले. त्याचसोबत, अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवाद्यांना सलमान घाबरत असल्याचे त्याने दाखवून दिलेय. अंडरवर्ल्डचा त्याच्यावर दबाव असल्यामुळेच त्याने वीकेण्ड का वारमध्ये ते वक्तव्य केले. त्याचे अंडरवर्ल्डमधील व्यक्तींसोबत फोटोसुद्धा आहेत. त्याच्या चित्रपटांना पैसा कुठून मिळतो ते सर्वांनाच माहितीये.

वाचा : अमूलच्या ‘त्या’ जाहिरातीमुळे हृतिकला आले रडू!

आपण दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा जावई असल्याचा दावाही जुबैरने केला होता. मात्र, त्याचे दाऊदच्या कुटुंबाशी काहीच संबंध नसल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. यावर तो म्हणाला की, माझा फोन पूर्णवेळ कलर्सच्या टीमकडे होता. त्यामुळे प्रोमोमध्ये काय दाखवले जातेय याची मला कल्पना नव्हती. तसेच, मला टीव्हीसुद्धा पाहण्याची परवानगी नव्हती. कलर्सने टीआरपीसाठी माझ्या नावाचा उपयोग केलाय.