हिंदी स्टार्सना लागले ‘बाळा’ गाण्याचे वेड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश आचार्य, म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले लाडके व्यक्तिमत्व! अश्या या लाडक्या व्यक्तिमत्वाने दिग्दर्शित केलेल्या ‘भिकारी’ सिनेमाच्या गाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे, नुकतेच प्रदर्शित झालेले ‘बाळा’ या गाण्याने तर हिंदी कलाकारांना देखील वेड लावले आहे. स्वप्नील जोशीवर चित्रित करण्यात आलेल्या या सिनेमाच्या ‘बाळा’ गाण्यातील स्टेप्स सध्या भरपूर व्हायरल झाली असून, याचे अनुकरण हिंदीचे प्रसिद्ध स्टारमंडळी करताना दिसत आहेत.

डान्समास्तर गणेश आचार्य याच्या सिनेमातील ‘बाळा’ गाण्यावर रणवीर सिंग, बॉबी देओल, तुषार कपूर, कुणाल खेमू, वरूण धवन, अर्षद वारसी या हिंदी अभिनेत्यांनी तर परिणीती चोप्रा, जॅकलीन फर्नांडीस आणि तापसी पन्नू या अभिनेत्रींनी ठेका धरला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात श्रेयस तळपदे हा हिंदीत चमकणारा मराठी चेहरा देखील आपल्याला पाहायला मिळत असून, भिकारी सिनेमाच्या प्रदर्शनाची ही मंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत.

वाचा : जाणून घ्या ‘जेठालाल’ची दर दिवसाची कमाई

इग्लंड येथे शूट करण्यात आलेल्या या गाण्यात स्वप्नीलने पहिल्यांदाच ‘हिप हॉप’ केलेला पाहायला मिळत असून, या गाण्यातील त्याची सिग्नेचर स्टेप्स खूप गाजत आहे. स्वप्नीलच्या चाहत्यांमध्ये देखील हे गाणे खूप प्रसिद्ध झाले आहे. स्वप्नीलच्या नृत्याविष्काराचा हा नमुना असून, या गाण्यासाठी त्याने घेतलेली मेहनतदेखील दिसून येते.

मी मराठा फिल्म प्रॉडक्शनचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन प्रस्तुत हा सिनेमा येत्या ४ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यात ऋचा इनामदार ही नवोदित अभिनेत्री झळकणार असून, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा हे कलाकार देखील आपापल्या प्रमुख भूमिकेत असतील.

वाचा : ‘मला मुलं हवीत पण लग्न.. नको रे बाबा’

दरम्यान, याच चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील जोशी, गणेश आचार्य आणि रुचा इनामदार येत्या गुरुवारी, ३ ऑगस्टला दुपारी १२ ते १ या वेळेत लोकसत्ताच्या फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये येणार आहेत. त्यांच्याशी लाइव्ह गप्पा मारण्याची संधी यावेळी तुम्हाला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood celebs doing swapnil joshi steps from bhikari movie song bala