Loveratri Trailer. नौरात्रोत्सवाची रंगत आणि त्याचा प्रेमाची जोड देत दिग्दर्शक अभिराज मिनावाला ‘लवरात्री’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. ‘सलमान खान फिल्म्स’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष शर्मा आणि वरिना हुसैन हे दोघंही चित्रपट जगतात पदार्पण करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या चाहत्यांचंही लक्ष वेधलं आहे. सलमान खानची बहीण, अर्पिता खान शर्मा हिचा पती, आयुष शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे खानदानसाठीसुद्धा हा चित्रपट तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. प्रेमाचा पहिला बहर आणि एखाद्या प्रेमळ व्यक्तीचा आपल्या आयुष्यात प्रवेश झाल्यावर साऱ्या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलतो, याचं चित्रण ‘लवरात्री’तून करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरमधून, गुजरातमधील नौरात्रोत्सवादरम्यानची धुम, कल्ला याचीही झलक पाहायला मिळत आहे. त्यातूनच चित्रपटातून एक प्रेमकथाही साकारण्यात आल्याचं कळत आहे. अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरच आता ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा ‘लवरात्री’ बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood movie loveratri official trailer aayush sharma warina hussain watch video salman khan