बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने पती साहिल संघापासून विभक्त झाल्याचे गुरुवारी सोशल मीडियावर जाहीर केले. त्यानंतर बॉलिवूडमधील आणखी एका जोडीने घटस्फोट दिल्याचं जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला. ही जोडी म्हणजे लेखिका कनिका ढिल्लोन आणि दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी. या दोन्ही घटनांनंतर कनिका आणि दिया मिर्झाचा पती साहिल यांचं एकमेकांशी अफेअर असल्याने घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या सर्व चर्चांवर आता खुद्द कनिकाने ट्विटरवर पोस्ट लिहित स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कनिकाने ट्विटरवर लिहिलं, ‘हास्यास्पद, बेजबाबदारपणा! लेखन हे माझं काम आहे. दोन बातम्या एकाच वेळी समोर आल्याने त्यांचा एकमेकांशी संबंध असेल असा अर्थ होत नाही. मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात दिया किंवा साहिलला भेटले नाही. कृपया या अफवा पसरवणं बंद करा.’

आणखी वाचा : मेगास्टार चिरंजीवीच्या मुलासोबत कियाराचं खास डिनर

पाच वर्षांच्या संसारानंतर दिया आणि साहिल विभक्त झाले. एकमेकांच्या संमतीने हा निर्णय घेतल्याचं दियाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं. घटस्फोटानंतरही आमच्यात मैत्री कायम राहील असंही तिने त्यात म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dia mirza ex husband sahil sangha dating kanika dhillon rumours here is the truth ssv