‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक वीणा मलिक ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परतली आहे. ‘बिग बॉस’मध्ये वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आल्यानंतर वीणा काही चित्रपटांमध्येही झळकली होती. सध्या ती ‘पाक न्यूज’ या पाकिस्तानी वाहिनीमध्ये काम करत आहे.
‘पाक न्यूज’ या वाहिनीच्या ट्विटर हॅण्डलवर वीणाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओत ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आगपाखड करताना दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या भेटीवर तिने टीका केली. हजारो मुस्लिम लोकांच्या आयुष्याची वाट लावण्यास हे दोन मोठे नेते कारणीभूत असल्याचेही तिने म्हटलेय.
वाचा : ‘मधुर भांडारकरांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस देणार’
भारतीय चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका केल्याबद्दल पाकिस्तानी नागरिकांकडून तिच्यावर टीकांचा वर्षाव करण्यात आला होता. आता तिच वीणा पाकिस्तानी वाहिनीमध्ये वृत्त निवेदकाचे काम करत आहे.
वाचा : लेखक असूनही मी वाचकाच्या दृष्टीनेच पुस्तकं वाचतो- प्रल्हाद कुडतरकर
उपरोक्त वाहिनीने शेअर केलेला व्हिडिओ
Narendra #Modi meets Israeli PM Benjamin#PakNews #BreakingWithVeena #ModiInIsrael @iVeenaKhan pic.twitter.com/n8xvQcW3YZ
— Pak News (@PakMGOfficial) July 4, 2017
याआधी पती असद बशीर खान खट्टक याच्याशी घटस्फोट घेतल्यामुळे वीणा चर्चेत आलेली. वीणाने घटस्फोटासाठी स्वतः अर्ज दाखल केल्यामुळे यात तिचाच दोष आहे, असे वातावरण तयार झाले होते. यानंतर खुद्द वीणाने एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटाबद्दल खुलासा केला होता. मी पैशासाठी लग्न केले, असे लोकांना वाटते. असदकडचे पैसे संपल्यामुळे मी त्याला ‘तलाक’ देतेय, असे लोक सध्या म्हणतायेत. पण सत्य काही वेगळेच आहे. असदने मला अनेकदा मारहाण केली. शारीरिक व मानसिक छळ केला. यामुळे मी घटस्फोटाचे पाऊल उचलले, असे ती म्हणालेली. वीणाने जानेवारीमध्ये कौटुंबिक न्यायालयात घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघांमधील मतभेद एवढे वाढलेले की, भविष्यात एकत्र राहणे दोघांनाही कठीण वाटू लागले होते.