बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या सिनेमाला लहानग्यांपासून मोठ्यांची देखील पसंती मिळाली होती. या सिनेमात हृतिक रोशन, प्रिती झिंटा, रेखा यांच्यासोबत आणखी एक सर्वात महत्वाचं पात्र होतं ते म्हणजे ‘जादू’. ‘कोई मिल गया’ सिनेमातील जादूने बच्चेकंपनीला तर वेडच लावलं होतं. एलियन असलेल्या जादूला सर्वांनीच पंसती दिली.
सिनेमाला १८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हृतिक रोशनने एक खास फोटो शेअर करत जादूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हृतिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सिनेमाला १८ वर्ष पूर्ण झाली असली तरी जादूला मात्र त्यांने २१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामागे एक खास कारण आहे. हृतिकने जादूचा आणि जादूसोबत त्याचा असे दोन फोटो शेअर केले आहेत.
हे देखील वाचा: “आता मला लाज वाटत नाही”, अभिनव शुक्लाने आपल्या ‘या’ आजाराचा केला खुलासा
हे फोटो शेअर करत हृतिक कॅप्शनमध्ये म्हणाला, ” हे त्याच्यासाठी ज्याने रोहितचं आणि वैयक्तिकरित्या माझ्या आयुष्यात आनंद आणला आणि माझ्या आयुष्यात जादू निर्माण केली. जादूने रोहितचा हात पकडला, त्याच्या जखमा भरल्या, चमत्कारांमध्ये विश्वास निर्माण केला.” असं हृतिक पोस्टमध्ये म्हणालाय.
View this post on Instagram
पुढे पोस्टमध्ये त्याने लिहिलं, ” जादू जेव्हा रोहितच्या आयुष्यात आला तेव्हा तो फक्त तीन वर्षांचा होता. १८ वर्ष झाली आता तो २१ वर्षांचा झालाय. कधी कधी मी विचार करतो की आज तो कसा दिसत असले. तुम्ही काय विचार करत. हॅपी बर्थ डे जादू” हृतिकने शेअऱ केलेल्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी पसंती दिलीय. तसचं हृतिकची आधीची पत्नी सुझेन खानने देखील कमेंट केलीय. “आतापर्यंतचा सर्वात सगळ्यात स्वीट चेहरा” अशी कमेंट सुझेनने केली आहे.
तर हृतिक रोशनचे वडील आणि ‘कोई मिल गया’ सिनेमाचे निर्माता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी देखील हृतिकच्या पोस्टवर कमेंट करत जादूला वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.