शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा आपल्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाचे प्रमोशन अनोख्या अंदाजात करताना दिसत आहेत. चित्रपटाचे मिनी ट्रेलर्स असो किंवा पहिल्या गाण्याच्या प्रदर्शनासाठी अंमलात आणलेली नवी कल्पना शाहरूख प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. चित्रपटातील पहिल्या गाण्याच्या प्रदर्शनासाठी ज्या शहरात सर्वात जास्त सेजल नावाच्या मुली राहतात अशा शहराला तो भेट देईल असं तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्याने भेट दिलीही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लवकरच चित्रपटातील दुसरं गाणं ‘बीच बीच में’ प्रदर्शित होणार आहे आणि यासाठीसुद्धा शाहरूखने एक अनोखी कल्पना आणली आहे. मुंबईतील नाइट क्लबमध्ये ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित होणार असून यासाठी शाहरूख आणि अनुष्का वेगवेगळ्या क्लबमध्ये जाणार आहेत. या दोघांसोबत दिग्दर्शक इम्तियाज अलीसुद्धा असणार आहे. ‘बीच बीच में’ हे गाणं पब आणि क्लबसाठी विशेष असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या गाण्यात शाहरूख आणि अनुष्काचा अफलातून डान्सदेखील पाहायला मिळणार आहे. दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरातील काही ठरावीक क्लबमध्ये शाहरूख, अनुष्का आणि इम्तियाज जाणार आहेत. ३ जुलै म्हणजेच सोमवारी हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

वाचा : महिमा चौधरीच्या भाऊ आणि वहिनीचा अपघातात मृत्यू

आपल्या आवडत्या कलाकरांना क्लबमध्ये भेटण्याची आणि त्यांच्यासोबत डान्स करण्याची चाहत्यांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. चित्रपटाच्या मिनी ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमातून अनुष्का आणि शाहरूख तिसऱ्यांदा एकत्र येताहेत. त्यात इम्तियाजबरोबर या दोघांचाही हा पहिलाच सिनेमा असल्याने त्याच्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. ४ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.