कॉमेडियन कपिल शर्माच्या आगामी ‘फिरंगी’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. काही काळापासून छोट्या पडद्यावरून दूर राहिलेला कपिल लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. टेलिव्हिजनवरील त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्यापासून अनेक चर्चा रंगल्या होत्या. कपिल नैराश्यात असून तो व्यसनाधीन झाल्याचंही म्हटलं जात होतं. या सर्व गोष्टींवर आता स्वत: कपिलने भाष्य केलं आहे. जुहू येथे ‘फिरंगी’च्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात त्याने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल त्याचा शो बंद झाल्यानंतर नैराश्यात गेला होता. ‘हो, मी हे कबूल करतो की मी नैराश्याच्या छायेत होतो. १२ दिवसांसाठी मी स्वत:ला माझ्या कार्यालयात डांबून घेतलं होतं आणि सलग १२ दिवस दारू पित होतो. माझ्या जवळच्या मित्रांना माझी परिस्थिती समजत होती. त्यांनी मला यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काहीच फरक पडला नाही,’ असं तो म्हणाला.

सेटवर आलेल्या काही कलाकारांना त्याने ताटकळत ठेवल्यामुळे ‘कपिल शर्मा शो’चे शूटिंग रद्द होऊ लागले होते. यानंतरच सोनी वाहिनीने त्याचा शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या गोष्टीची लोकांमध्ये झालेल्या अवाजवी चर्चेचा जास्त त्रास झाला, असंही त्याने सांगितलं. ‘मी सेटवर कलाकारांना ताटकळत ठेवायचो, असं ते म्हणायचे. त्यावेळी खूप तणावाखाली होतो आणि याच तणावामुळे मी सेटवर उशिरा पोहोचू लागलो. पण नंतर फोन करून मी कलाकारांची माफीदेखील मागायचो. त्यामुळेच ते पुन्हा शूट करण्यासाठी तयार व्हायचे,’ असं कपिल म्हणाला.

PHOTO : ‘वीरे दी वेडिंग’साठी तुम्ही तयार आहात ना?

सुनिल ग्रोवरशी झालेल्या वादासंदर्भातही कपिलने खुलासा केला. ऑस्ट्रेलिया टूरदरम्यान नेमकं काय घडलं हे त्याने सांगितलं. ‘अत्यंत व्यग्र वेळापत्रकामुळे मी तणावाखाली होतो. टूरच्या आदल्या रात्रीच माझ्या एका जुन्या सहकलाकाराचं निधन झालं होतं. मला टूर रद्द करायची होती, पण तिकिटं विकली गेल्याने मी असं करू शकत नव्हतो. इतकंच नाही, तर माझ्या टीममधील एका महिलेचा चंदन प्रभाकरशी वाद झाला होता. ती महिला माझ्याकडे रडत आली होती. चंदनवर मी रागावलो आणि त्याला ओरडलो. सुनिलसोबत माझा कोणता वादच झाला नव्हता. मी चंदनसोबत बोलत असताना तो मधे आला.’

वाचा : आणखी एका हॉलिवूड दिग्दर्शकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

या कार्यक्रमाअखेर पुन्हा एकदा कपिलने सुनिलसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, कपिलचा ‘फिरंगी’ चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.