अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर अली खान पतौडी त्याच्या जन्मापासून चर्चेत आहे. सुरूवातीला त्याचे नाव तैमुर का ठेवले यावरुन वाद सुरु झाला. त्याच्या नावामुळे करिना आणि सैफला सोशल मीडियावर चांगलेच सुनवले गेले होते. तो वाद संपतो न संपतो तोच तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले. तो खरंच सैफिनाचा मुलगा आहे का असे प्रश्नही उपस्थित केले गेले. सोशल मीडियावर तैमुरचे सर्वच फोटो सैफिनाचे चाहते अगदी कौतुकाने पाहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…म्हणून राखी सावंत कोर्टात बुरखा घालून गेली

सध्या गरोदरपणात जास्तीत जास्त स्टायलिश राहण्याकडे अभिनेत्री लक्ष देतात. करिनानेही गरोदरपणातले प्रत्येक दिवस एन्जॉय केले. पण कितीही पुढारलेले विचारसणीचे असले तरी करिनाचा जुन्या रुढी- परंपरांवर विश्वास आहे. सतत कॅमेऱ्यासमोर असल्यामुळे तैमुरला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून कुटुंबातील मोठ्यांनी त्याची नजर काढायचं सुचवलं. त्यामुळे करिनाने तृतिथपंथीयांकडून तैमुरची नजर काढून घेतली. नजर काढण्याच्या मोबदल्यात तिने चक्क ५१ हजार रुपये दिले.

तैमुरच्या जन्मानंतर करिनाचे वजन वाढले होते. पण आता ती योग्य डाएट आणि व्यायामाच्या सहाय्याने पुन्हा फिट होत आहे. पाच महिन्यांचा तैमुर आई करिनासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सध्या सर्रास दिसतोय. अभिनेता तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये करिना तैमुरसोबत पाहायला मिळाली होती. यावेळी तैमुरचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्याप्रमाणे करिना आपल्या चेहऱ्यावरील अत्यंत आकर्षक अशा हावभावांसाठी प्रसिद्ध आहे तसेच हावभाव तैमुरच्या गोंडस चेहऱ्यावर टिपले गेले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoors khandaan gave 51k to the transgender community to perform this ritual on baby taimur ali khan