अभिनेत्री कतरिना कैफचा आज वाढदिवस असून कतरिना आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करतेयय. १६ जुलै १९८३ साली हॉन्गकॉन्गमध्ये कतरिनाचा जन्म झाला होता. कतरिनाने अगदी कमी वयापासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तर २००३ सालामध्ये आलेल्या ‘बूम’ या सिनेमातून कतरिनाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली.
अभिनेत्री कतरिना कैफने आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली असली तरी एकेकाळी कतरिनाला बॉलिवूडमध्ये काम मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. २००३ साली तर जॉन अब्राहमने एका सिनेमातून कतरिनाला काढून टाकलं होतं. जॉनने त्याच्या ‘साया’ या सिनेमातून कतरिनाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि अभिनेत्री तारा शर्माची निवड केली. हे दु:ख कतरिनाला सहन झालं नाही आणि ती सलमानसमोर ढसाढसा रडली होती.
या घटनेनंतर कतरिनाला प्रचंड वाईट वाटलं होतं. एका मुलाखतीत सलमान खानने त्यावेळी कतरिनाची अवस्था कशी झाली होती यावर खुलासा केला होता. तो म्हणाला, ” काही वर्षांपूर्वी जॉनने कतरिनाला त्याच्या सिनेमातून काढून टाकलं होतं. मला आठवतंय कतरिनाला काढून तारा शर्माला घेण्यात आलं होतं. तेव्हा कतरिना रडतं होती की माझं पूर्ण करिअर संपलं. तीन दिवस मला ते सहन करावं लागलं होतं. मला वाटलं की पुढे जाऊन ती मोठी कलाकार होणार आहे मग कशाला रडते. मी तिला म्हणालो देखील आज तू रडतेयस मात्र नंतर तूला ही गोष्ट आठवून तुला हसू येईल.”
View this post on Instagram
त्यानंतर २००९ सालामध्ये कतरिना आणि जॉन अब्राहम ‘न्यूयॉर्क’ सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमामध्ये जॉन असल्याने कतरिना नाराज होती. यावर सलमान मुलाखतीत म्हणाला,” कतरिना माझ्याकडे आली होती आणि म्हणाली या सिनेमात जॉन आहे. तेव्ही मी म्हणालो तू फक्त सिनेमाची कथा आणि डायरेक्टरवर लक्ष दे.. सह कलाकार तर कुणीही असू शकतो. कतरिनाच्या मनात जॉनने तिला सिनेमातून काढल्याची खंत होती. मात्र कतरिनाला मी समजावलं आज तू अशा जागी आहेस की तू जॉनला काढू शकतेस. मात्र ते योग्य नाही.” असं म्हणत सलमानने कतरिनाची त्यावेळी समजूत घातल्याचं तो म्हणाला.
View this post on Instagram
यानंतर कतरिना आणि जॉन ‘न्यूयॉर्क’ सिनेमात एकत्र झळकले. शिवाय हा सिनेमा चांगलाच हिट ठरला होता. या सिनेमातील जॉन आणि कतरिनाच्या अभिनयाचं कौतुक झालं होत.