‘लायन’ या हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठमोळा बालकलाकार ‘सनी पवार’ झळकला होता. ‘लायन’ चित्रपटाने ऑस्करपर्यंत धडक मारली होती. सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटात सनीने ‘शेरू’ ही व्यक्तिरेखा साखरलेली. त्याने साकारलेली शेरूची भूमिका जगभरात गाजली होती व हा चित्रपट ऑस्करवारीत असल्याने सनीच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. त्याला काही महिन्यापूर्वी अभिनयासाठी ‘द रायझिंग स्टार’ हा पुरस्कार देवून लंडनमध्ये सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्याचे विशेष कौतुक बराक ओबामा, रॉक, सचिन तेंडुलकर अशा अनेक मान्यवरांनी केले होते. त्यामुळे हा छोटा बालकलाकार जणू हॉलिवूडचा हिरोच बनला. आता हा हॉलिवूड स्टार मराठीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ‘मधुर भांडारकरांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस देणार’

आगामी ‘अ ब क’ या मराठी चित्रपटातून सनी  मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘अ ब क’ या  चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत असून ‘हरी’ ही व्यक्तिरेखा साकारताना तो दिसेल. सनी सध्या इयत्ता चौथीध्ये शिकत आहे.  ग्रॅव्हेटी एण्चरटेन्मेन्ट आणि गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर कुलकर्णी निर्मित असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमर शेडगे हे असून लेखन आबा गायकवाड यांचे आहे. चित्रपटाची गीते गुरू ठाकूर याने लिहली असून ‘सरकार राज’, ‘रक्तचरित्र’, ‘भूत’ अशा अनेक चित्रपटांचे संगीतकार बापी – तुतल हेच ‘अ ब क’चेही संगीत दिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कॅमेरामन महेश आणे हे चित्रपटाचे कॅमेरामन असून सनी पवारसह  तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी असे अनेक दिग्ग्ज कलावंत या चित्रपटात काम करणार आहेत.

वाचा : शाहरूखकडून सलमानला महागडी कार गिफ्ट

या चित्रपटाचे वैशिष्टय असे की हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू अशा पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस पार्श्वगायण करणार आहेत. अशी माहिती चित्रपटाचे निर्माते मिहीर कुलकर्णी व  दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी दिली.