अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी तिच्या खासगी आयुष्यामुळे आणि फीटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाने एका शोमध्ये तिच्या आणि अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर आणि बहिण अमृता अरोरा यांच्यात असलेल्या मैत्रीबद्दल सांगितलं आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, “मलायकाने सुपर डान्सर या शोमध्ये स्पर्धकांना मैत्रीचे महत्त्व सांगताना तिच्या मैत्रीबद्दल सांगितलं आहे. एकमेकांना कधी विसरु नका. तुम्ही मोठे व्हाल आणि तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार त्यात देखील तुम्ही मोठे व्हाल. पण ही मैत्री कधी तोडू नका. एकमेकांना कॉल करा मेसेज करा. ही मैत्री विशेष असेल आणि तुम्ही हे नेहमीच लक्षात ठेवा,” असं मलायका म्हणाली.

पुढे मलायका करीना, करिश्मा आणि अमृता यांच्यात असलेल्या मैत्री विषयी म्हणाली, “त्या दोन बहिणी आहेत, आणि आम्ही दोन बहिणी आहोत. आमच्या आवडी-निवडी या काही प्रमाणात सारख्या आहेत. हे सगळं ग्रुपमधला एक काय बोलतो यावर अवलंबून असते. परंतु आमच्या चौघांमध्ये एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे आम्हाला खायला खूप आवडत. म्हणून सगळं काही हे जेवणाच्या भोवती फिरतं असतं.”

आणखी वाचा : Video : वडिलांच्या मृत्यूसाठी रुग्णालय जबाबदार, सगळे डॉक्टर देव नसतात- संभावना सेठ

दरम्यान, या आधी मलायका तिच्या बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळे चर्चेत होती. वयाने मोठ्या स्त्रीला डेट करत असल्याच्या सगळ्या अफवांना त्याने उत्तर दिलं आहे. मलायका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सरची परिक्षक आहे.

Story img Loader