रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कधीकधी जवळच्या व्यक्तींशी संवाद साधण्याचीही वेळ आपल्याला मिळत नाही. अर्थात यात दोष कुणाचाच नसतो. पण, तरीही मनात एक वेगळ्या प्रकारची रुखरुख असते. त्या एका व्यक्तीला आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही याची सल मनात असते आणि मग एखाद्या कवितेच्या चार ओळीदेखील मनातील सर्व भावनांना वाट मोकळी करुन देतात. अभिनेता सुबोध भावेसुद्धा अशाच एका प्रसंगाला सामोरे गेला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेली एक सुरेख कविता पाहता तरी याचा अंदाज लावणं सहज शक्य होतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कलाकार सहसा विविध चित्रपट, जाहिराती, कार्यक्रमांच्या निमित्ताने घरापासून, आपल्या माणसांपासून दूर असतात. पण, कुटुंबीयांच्या, जवळच्या व्यक्तींच्या आठवणी मात्र त्यांच्या मनात सतत घर करुन असतात. आठवण ही एक अशी गोष्ट आहे, जी क्षणार्धातच तुम्हाला हसवते, एका वेगळ्या दुनियेत नेते आणि बऱ्याचदा तर तुमच्या डोळ्यात पाणी आणून जाते. पत्नीच्या आठवणीने सुबोधचीही अशीच परिस्थिती झाली होती. म्हणूनच की काय त्याने एका कवितेच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करुन दिली. ही कविता म्हणताना शेवटी सुबोधलाही भरुन आल्याचं पाहायला मिळतंय. ‘हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन, बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन, कावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही, कोणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही….’, ही सुरेख कविता सुबोधने त्याच्या अंदाजात सादर केली.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

वैभव जोशीची कविता सादर करताना सुबोधने त्यात पत्नीविषयी सर्व भावना व्यक्त केल्या. या कवितेच्या प्रत्येक शब्दातून सुबोधचं आपल्या पत्नीवर म्हणजेच मंजिरीवर असलेलं प्रेम व्यक्त होत आहे. एक कलाकार म्हणून सुबोध नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. पण, त्याची ही कविता पुन्हा एकदा धुसर झालेल्या नात्यांमध्ये नवे तेज भरत आहे यात शंकाच नाही. त्यातही नात्यात दुरावा कधी येऊच शकत नाही, कारण ‘कोणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही’.