पुण्यात गुरुवारी १२५ कलाकारांनी मिळून मानाच्या कसबा गणपतीची महाआरती केली. यामध्ये राहुल सोलापूरकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, आर्या आंबेकर यांच्यासोबत इतर नवोदित कलाकारांचा समावेश होता. महाआरतीनंतर कलाकारांनी अथर्वशीर्षाचं पठणही केलं.
VIDEO : लालबागच्या राजाचा ‘हा’ व्हिडिओ पाहिलात का?
यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यादेखील उपस्थित होत्या. पुणे महापालिकेच्या वतीने या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व कलाकारांनी फेटा बांधून पारंपरिक वेशभूषेत कसबा गणपतीची महाआरती केली. यानंतर महापालिकेच्या वतीने स्मृतीचिन्हे देऊन या सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.