बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच बऱ्याच चर्चांना उधाण आले होते. त्यांचे फोटो लीक होऊन आता जवळपास महिना उलटला असला तरीही रणबीर अजूनही या फोटोंमुळे चर्चेत आहे. त्या फोटोंमध्ये हे दोघं न्यूयॉर्कमधील एका हॉटेलबाहेर धुम्रपान करताना दिसले. या फोटोंवर बॉलिवूड जगतातील अनेक मंडळींनी आपले मत मांडले होते. त्यानंतर आता ‘पद्मावती’मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणवीर सिंगलाही फोटोंबद्दल त्याचे मत विचारण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा

एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणवीर म्हणाला की, मी केवळ मला आलेल्या अनुभवांविषयी बोलू शकतो. एकेकाळी मी माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत एका खास ठिकाणी होतो. माझे ते खासगी क्षण कोणासमोर येऊ नयेत असे मला वाटत होते. पण, तसे करण्यापासून मी कोणालाच रोखू शकलो नाही. चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या अनुभवांना आयुष्यात सामोरं जावं लागतं. आयुष्यात काही गोष्टी खूप त्रासदायक असतात पण त्यातून तुम्हाला मार्ग काढता आला पाहिजे.

वाचा : सिने‘नॉलेज’ आर. माधवनने ‘रंग दे बसंती’मध्ये साकारलेल्या भूमिकेचे नाव काय?

माहिराने त्यावेळी शॉर्ट ड्रेस घातला होता. तसेच ती तेव्हा धुम्रपानही करत होती. त्यामुळे पाकिस्तानी नेटिझन्सनी तिच्यावर बरीच टीका केली होती. यावर रणवीर म्हणाला की, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची काही मुल्यं, मतं असतात. तसेच, प्रत्येकजण आपल्यापरिने एखाद्या गोष्टीचा अर्थ लावत असतो. तुम्ही दुसऱ्यांचे ऐका पण त्याप्रमाणे वागलेच पाहिजे असे नाही. शेवटी, जगा आणि जगू द्या हाच मूलमंत्र महत्त्वाचा आहे. जगात इतरही महत्त्वाच्या गोष्टी असून, त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. माहिरा एक उत्तम अभिनेत्री आहे. लोकांनी तिला समजून घेण्याची गरज आहे.

सेलिब्रिटी म्हणून जगात वावरणं हे काही सोप नसतं, हे एकंदरीत रणबीर – माहिरा प्रकरणावरून दिसून येते.