बॉलिवूडचा दबंग खान सध्या आपल्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आपल्या व्यस्त कामकाजातून सलमान कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढत आहे आणि यावेळी सलमानसोबत पुन्हा एकदा त्याची तथाकथित प्रेयसी लुलिया वंतूर दिसली. सोहेल खानच्या घराबाहेर सलमान खान, लुलिया आणि मेव्हणा आयुष शर्मा माध्यमांच्या काही फोटोंमध्ये टिपले गेले. या पार्टीमध्ये नंतर अरबाज खान, अरबाजचा मुलगा अरहान, पती शकीलसोबत अमृता अरोरासुद्धा सहभागी झाले.
सलमान खान आणि लुलिया वंतूर ही बॉलिवूडची बहुचर्चित जोडी असल्याचं सर्वांनाच माहित आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. सलमान खान आणि त्याची तथाकथित प्रेयसी लुलिया वंतुर हे अद्यापही त्यांच्या नात्याबाबत सर्वांसमोर काहीच बोलले नाहीत. सलमान हा कबीर खानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटासाठी लडाखला गेला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर सलमान लुलियाच्या आई-वडिलांना जवळपासच्या भागात फिरण्यासाठी नेत असल्याचे समोर आले होते. सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानच्या मुलाच्या म्हणजेच निर्वान खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभामध्ये संपूर्ण खान कुटुंबासह लुलिया वंतूरनेही हजेरी लावल्याचे दिसले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा