‘आई माझी काळुबाई’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झाली आहे. प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्या मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. संग्राम साळवी हा मालिका विश्वातला नावाजलेला चेहरा या मालिकेत दिसणार आहे. संग्राम या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून अमोघचा म्हणजेच विवेक सांगळेचा चुलत भाऊ मिलिंद, हे पात्र तो साकारणार आहे.
‘मिलिंद’ पोलीस आहे, पण स्वभावाने फार उन्मत्त आहे. वडील आमदार, घराची श्रीमंती यांमुळे त्याला फार अहंकार असतो. हे पात्र थोडं खलनायकी असलं, तरी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारं आहे, असा विश्वास संग्रामनं व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : ‘आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या’; सुबोध भावे झाला भावूक
‘आई माझी काळुबाई’ ही मालिका आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेत काळुबाईच्या भूमिकेत अभिनेत्री अलका कुबल झळकणार आहेत. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.