करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आणि गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाची बादशाहत कायम राखणाऱ्या अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस. ‘किंग ऑफ बॉलिवूड’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा अभिनेता ५२ वर्षांचा झाला आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याच्या बर्थडेचे ग्रॅण्ड सेलिब्रेशन अलिबागमध्ये करण्यात आले. या पार्टीला चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. कालच या पार्टीतील मजा-मस्तीचे फोटो करण जोहर, फराह खान आणि इतरही काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

वाचा : चर्चा तर होणारच ना!

तर दुसरीकडे आज शाहरूखच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर त्याच्या चाहत्यांनी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शाहरुखचे चाहते त्याच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्याबाहेर जमतात. रात्रीपासूनच हजारोंच्या संख्येने चाहते शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी उभे असतात. यंदाही चाहत्यांनी ‘मन्नत’बाहेर अशीच गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरांनी अनेकांचे मोबाईल फोन लंपास केल्याचे वृत्त आहे.

वाचा : प्रियांकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ते १२ जणांनी त्यांचे मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. यासंबंधी तपास सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, पोलीस आपली तक्रारच दाखल करून घेत नसल्याचे मोबाईल चोरीला गेलेल्या लोकांनी सांगितले

Story img Loader