देशात उद्दभवलेल्या करोना माहामारीच्या संकटानंतर आता पुन्हा एकदा सारं काही सुरळीत होत आहे. यातच आता मराठी सिनेसृष्टीतही अनेक नवे प्रोजेक्ट सुरु आहेत. अनेक मराठी चित्रपटांच्या घोषणा होत असतानाच त्यात आता आणखी एका बिग बॅनर चित्रपटाची भर पडली आहे.
मराठीमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. ‘तमाशा लाईव्ह’ असं या सिनेमाचं नावं असून सोनीली या सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या रुपात झळकणार आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय. फोटोच्या कॅप्शनध्ये तिने लिहिलंय. “तमाशा Live’ महाराष्ट्राचा बहुरंगी बहुढंगी तमाशा!”
हे देखील वाचा: हृतिक रोशनने जादूला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला “आज तो…”
संजय जाधव या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून पटकथा संजय जाधव यांचीच आहे. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग ‘तमाशा लाईव्ह’चे निर्माता आहेत.
View this post on Instagram
हे देखील वाचा: “आता मला लाज वाटत नाही”, अभिनव शुक्लाने आपल्या ‘या’ आजाराचा केला खुलासा
‘तमाशा लाईव्ह’विषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ” हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. तर कोरिओग्राफी उमेश जाधव यांची आहे. एकंदरच चित्रपटाची टीम एकदम भन्नाट आहे. मुळात सोनाली माझी खूप चांगली मैत्रीण आहे. परंतु आम्ही प्रथमच एकत्र काम करत आहोत. त्यामुळे या प्रोजेक्टबाबत मी खूपच उत्सुक आहे.”
या चित्रपटाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”संजय जाधव आणि सोनाली कुलकर्णी हे दोघेही आपापल्या विभागात एकदम अव्वल आहेत. संगीतमय चित्रपट आम्हीसुद्धा पहिल्यांदाच करत आहोत, त्यामुळे आमची पण उत्सुकता तेवढीच आहे. विषय वेगळा असल्याने प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.”
२०२२ म्हणजे पुढील वर्षी दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांना मोठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.