बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला आज (१४ जून २०२१) एक वर्ष लोटलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर वेगवेगळे युक्तीवाद केले गेले. तसेच त्यांची हत्या करण्यात आल्याचंही म्हटलं गेलं. त्याच्या कुटुंबियांनीही या प्रकरणात दाखल केली. त्याच्या मृत्यूचं प्रकरण तापल्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास कुठंपर्यंत आला आहे. याबद्दल सीबीआयने भाष्य केलं आहे.
१४ जून २०२० रोजी सुशांत सिंगने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनं बॉलिवडूच नव्हे, तर सगळेच हादरले होते. त्याच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. राहत्या घरात मृतदेह आढळून आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचं दिसून येत आहे, असंही मुंबई पोलिसांनी नोंदवलं होतं. मात्र, अनेकांनी ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचं म्हटलं. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसह अनेकांनी या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली होती.
सुशांतसिंहच्या वडिलांनीही या प्रकरणी अभिनेत्री पाटण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यातच बिहार सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केंद्राला केली आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता. या तपासाचं प्रकरण न्यायालयातही गेलं होतं. दरम्यान, सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपासाला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. मात्र, त्याबद्दल कोणतंही भाष्य सीबीआयकडून करण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित होते.
हेही वाचा- “सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती”
सुशांत सिंहच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी सीबीआयने या प्रकरणाच्या तपासाबद्दल भाष्य केलं आहे. “अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूसंदर्भातील सीबीआयचा तपास अद्याप सुरूच आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्वच बाबींचा सुक्ष्मपणे तपास केला जात आहे,” असं सीबीआयने म्हटलं आहे.
CBI investigation related to the death of actor Sushant Singh Rajput is still continuing and all the aspects of the case are being looked into meticulously: CBI official pic.twitter.com/l7KYvbz9Xe
— ANI (@ANI) June 14, 2021
हेही वाचा- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर काय घडलं वर्षभरात?
या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर सगळ्याचं लक्ष सीबीआयकडे होतं. या बद्दल सातत्याने विचारणाही केली जात होती. मात्र, सीबीआयकडून अधिकृत माहिती गेली नव्हती. सीबीआयकडून तपासाबाबत माहिती दिली जात नसल्यावरूनही राजकीय पक्षांकडून टीका केली जात आहे. त्यातच आता सीबीआयने ही माहिती दिली.