महिलांचे हक्क आणि समाजात त्यांना दिली जाणारी वागणूक या दोन्ही गोष्टींवर गेल्या काही दिवसांपासून खुलेपणाने बोलले जात आहे. या मुद्द्यांवर चित्रपटसृष्टीतही बऱ्याचदा खुलेपणाने बोलण्याला प्राधान्य देण्यात आले. महिलांच्या हक्कांविषयी प्रत्येकवेळी खुलेपणाने बोलणाऱ्यांमध्ये बी- टाऊन कलाकारही मागे नाहीत. त्यामध्ये अभिनेत्री विद्या बालनचे नाव आघाडीवर आहे. विद्या नेहमीच काही महत्त्वाच्या विषयांवर तिची मतं मांडत असते. काही दिवसांपूर्वी कलाविश्वातील लैंगिक शोषणाविषयीही तिने वक्तव्य केलं होतं. त्यामागोमागच आता तिने महिलांच्या हक्काविषयी एक वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

समाजात महिलांना समान दर्जा दिला जात नाही, असे तिचे ठाम मत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात तिने याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी तिने चित्रपटसृष्टीत महिला कलाकारांना मिळणारी संधी, कंगना रणौतचा घराणेशाहीचा वाद या विषयांवरही भाष्य केलं. ‘महत्त्वाकांक्षी महिला नेहमीच स्पष्टवक्त्या आणि आधुनिक विचारसरणीच्या असतात, असे एक अभिनेत्री म्हणून अनेकींकडे पाहिले जाते. कोणा एका मुद्द्यावर महिलांनाही त्यांचे स्वत:चे असे विचार, मतं असतात याकडे कोण लक्षच देत नाही’, असे विद्या म्हणाली. ‘बहुधा यामुळे पुरुषप्रधान समाजाला महिलांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल भयही वाटत असेल’, असे उपरोधिक विधानही तिने यावेळी केले.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Assembly Elections 2024 What is the type of home voting what are its benefits Nagpur news
गृहमतदान काय प्रकार आहे, त्याचे फायदे काय ?
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Megharani Jadhav
“धनुष्यबाणाला मत दिलं नाही तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची ‘लाडक्या बहिणीं’ना तंबी

समाजात महिलांना दिली जाणारी वागणूक पाहता आजही काही बाबतीत उदासीनताच पाहायला मिळते. याविषयीच सांगताना विद्या म्हणाली, ‘मतं मांडू न दिली गेल्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. आम्हाला या साऱ्याची उत्तरं हवी आहेत. आम्हाला पुढे जायचंय, स्वत:ला सिद्ध करायचंय यासाठी आम्ही आणखी प्रतिक्षा करण्याचा मुद्दाच नाही.’ विद्याचे हे वक्तव्य पाहता महिला सबलीकरणाचा मुद्दा तिने चांगलाच उचलून धरल्याचे स्पष्ट होत आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

विद्या सध्या तिच्या आगामी ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ती, एका ‘लेट नाइट रेडिओ शो’ची धुरा सांभाळणाऱ्या आरजेच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विद्याच्या अभिनय कौशल्याचा आणखी एक पैलू पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.