वरुण धवन सध्या मॉरिशसमध्ये आगामी ‘जुडवा २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. नुकताच वरुण नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये सहभागी झाला आणि यावेळी त्याने वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया भट्ट वरुणची जिवलग मैत्रिण आहे हे सर्वांनाच माहित आहे. आलियाप्रमाणेच अर्जुन कपूरसुद्धा वरुणचा चांगला मित्र आहे. टॉक शोमध्ये तू अर्जुनला काय सल्ला देशील असा प्रश्न विचारला असता यावर वरुणचे उत्तर ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. ‘१०० वर्षांपासून या चित्रपटसृष्टीत असल्यासारखे तू वागू नकोस,’ असे वरुण म्हणाला. आता वरुणने अर्जुनला हा सल्ला का दिला, याचं उत्तर मात्र तोच देऊ शकेल.

carbon Movie Trailer : ‘जिथे ऑक्सिजन मोफत मिळत नाही’

या टॉक शोमध्ये वरुणने चाहत्यांना माहित नसलेल्या अनेक गोष्टीही सांगितल्या. अर्जुन आणि तो बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वी एकाच अभिनय कार्यशाळेत शिकत होते आणि याच वेळी दोघांमध्ये चांगली मैत्री जमली असे वरुणने सांगितले. दोघांमध्ये एवढी चांगली मैत्री असताना अर्जुनला असा खोचक सल्ला द्यायची वरुणवर का वेळ आली हे तर वेळ आल्यावरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan advice to arjun kapoor that stop behaving like you have been in this industry for 100 years