फुटबॉल आणि वरुण धवन हे समीकरण खूप कमी लोकांना माहीत असेल. वरुणचं फुटबॉलवरील हे प्रेम ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिसून आलं. कारण यावेळी तो प्रमोशन सोडून चक्क फिफा वर्ल्ड कपचा प्री-गेम शो बघण्यासाठी गेला होता. हा विषय सध्या काढायचं कारण म्हणजे, वरुणने फुटबॉलपटू रोनाल्डिनोची नुकतीच भेट घेतली आहे. त्याच्यासोबत सेल्फी काढून वरुणने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरुण सध्या त्याच्या आगामी ‘जुडवा २’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मात्र आपल्या आवडत्या फुटबॉलपटूला भेटायची संधी त्याने सोडली नाही. ‘फुटसल लीग’च्या दुसऱ्या सिझनसाठी दिग्गज खेळाडू भारतात आले आहेत. अशा वेळी वरुणनेही या संधीचा फायदा घेत रोनाल्डिनोची भेट घेतली. वरुणच्या घरीच या दोघांची भेट झाली असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्यासोबतचा सेल्फी पोस्ट करत वरुणने मॅचसाठी त्याला शुभेच्छाही दिल्या. पोर्तुगीज भाषेत, ‘चांगल्या पद्धतीने खेळ(Jogaaaa bonitooo),’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं. सोशल मीडियावर हा सेल्फी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून साडेतीन लाखांहून अधिक लाइक्स याला मिळाले आहेत.

वाचा : सलमानचे ‘हे’ पाच चित्रपट तुम्ही कधीच पाहिले नसतील

दरम्यान, वरुणचा ‘जुडवा २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सलमानच्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan fan moment with ace footballer ronaldinho