ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी निधन झाले. ज्यांच्या प्रतिभेच्या धारानृत्याने मराठी साहित्यरसिकांना गेली सहा दशके रिझविले, सुखविले, जगायला शिकविले ते जीवन-जिप्सी अनंताच्या प्रवासाला निघून गेले. पाडगावकरांच्या जाण्याने जणू काव्योत्सवावरच पडदा पडला. पाडगावकरांसोबतच्या आठवणी ताज्या करणारे ‘लोकसत्ता’च्या आजच्या अंकातील लेख..