अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियानने मृत्यूपूर्वी शेवटचा कॉल पोलिसांना केल्याची चर्चा खोटी असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं. दिशाने शेवटचा कॉल तिच्या मैत्रिणीला केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सुशांतच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वी दिशाचा मृत्यू झाला होता.

मुंबई पोलिसांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, दिशा सालियनने तिची मैत्रीण अंकिताला शेवटचा कॉल केला होता. दिशाने मृत्यूपूर्वी १०० क्रमांकाला फोन केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी फेटाळला.

आणखी वाचा : “एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा”; कंगनाला सल्ला

दिशाचा ८ जून रोजी मुंबईतील एका इमारतीतील चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्यात दिशाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी मृत्यूची चौकशी सुरू केली. दिशाबाबत अफवा पसरवल्या प्रकरणी त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दिशाच्या मृत्यूनंतर एका आठवड्यानंतर १४ जून रोजी सुशांतचा मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळला.

Story img Loader