आता ईडीची पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात एंट्री होई शकते. राज कुंद्रा यांना मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केल्या संदर्भात पुरावा मिळाल्यानंतर आता ईडी या प्रकरणाची दखल घेणार आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास एजन्सी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची एफआयआर मागवेल आणि लवकरच गुन्हा नोंदवेल.
ईडी सूत्रांचे म्हणणे आहे की, राज कुंद्रा यांना FEMA अंतर्गत नोटीस समन्स बजावले जाऊ शकते. या प्रकरणात, कंपनीच्या संचालकांची देखील चौकशी होऊ शकते. शिल्पा शेट्टीची भूमिका पाहिल्यास तिचीही चौकशी होणार असल्याची शक्यत्ता आहे.
शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रावर अश्लील रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात पैशांच्या व्यवहाराचीही चर्चा आहे. ‘येस बँक’ खाते आणि राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी यांच्या यूबीए खात्यामधील व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. ईडी FEMA च्या नियमांतर्गत चौकशी करेल.
शिल्पा शेट्टीचाही सहभाग?
पॉर्न फिल्म्स आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीही पोलिसांच्या रडारवर आली आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याची झाडाझडती घेतली. तसेच शिल्पाची सहा तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचाही porn films प्रकरणात सहभाग आहे का? शिल्पाला यातून आर्थिक लाभ झाला का? या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
हेही वाचा – ‘हे तर आतंकवाद्यांसारखंच..’; राज कुंद्रांच्या अटकेवर सुनील पालची प्रतिक्रिया
पॉर्न फिल्म्स निर्मिती आणि प्रदर्शन केल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केलेली आहे. या प्रकरणात कुंद्रा यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची पोलिसांकडून चौकशी केली जात असून, राज कुंद्रा यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही जबाब शुक्रवारी नोंदवण्यात आला.